|| श्री गणेशाय नमः ||
|| श्री भैरवनाथ प्रसन्न ||
थोर सन्मित्र युवा फाउंडेशन थोरगव्हाण
समाजासाठी सर्व विचार फक्त विचारांच्या स्वरूपात ठेवून काही फायदा नाही समाजाच्या सर्व समस्यांसाठी काहीतरी खंबीर पावले उचलली गेली पाहिजे त्यावेळी समाजाची वाटचाल योग्य दिशेने होईल .20 जानेवारी 2015 ला काही तरुणांनी एक टीम तयार करण्याचे ठरविले आणि थोरगव्हाण गावामध्ये थोर सन्मित्र युवा फाउंडेशन थोरगव्हाण या नावाने मंडळाची स्थापना केली. थोर सन्मित्र युवा फाउंडेशन ची स्थापना करण्यामध्ये . चेतन प्रकाश पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे आणि ही सुकल्पना सुद्धा त्यांचीच आहे समाज म्हणजे एकमेकांच्या सहकार्याने विश्व हेतूने एकमेकांच्या मूलभूत व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी फक्त राहणाऱ्या व्यक्तींचा समूह नसून एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या गरजा पूर्ण करून सर्वांगीण विकास प्रगती करण्याचे परंपरा चालीरीती असलेल्या व्यक्तींचा समूह होय.
लोकशाही समाज रचनेत समाज संघटीत असल्याशिवाय अल्पसंख्यांक समाजाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही समाज संघटन हे प्रमुख उद्दिष्ट असावे. विविध उपक्रमाद्वारे स्वास्थ , शिक्षण, शेती , नागरी सुविधा , स्वच्छता , आरोग्य यासारख्या अन्य विषयांबाबत समाज घटकांचे प्रबोधन व्हावे , वर वधू मेळाव्याचे आयोजन व्हावे ग्रामीण भागात विवाह ही जटील समस्या निर्माण झालेली आहे ,उच्चशिक्षित , अशिक्षित शेतकरी शेतमजूर विधवा विधुर अपंग घटस्फोटीत या सर्व मुला मुलींचा परिचय मेळावा व्हावा व समाज बांधवांना वस्तुस्थितीचे व यथार्थ मार्गदर्शन व्हावे आम्ही आमचे अंगीकृत कार्य निखळपणे पारदर्शकतेने विवेकतेने व कटूता निर्माण न होता पार पाडू त्यावेळेस समाजाच्या आम्हाला हमखास सहकार्य मिळेल ही अपेक्षा.
दिव्याने दिवा लावत गेला की दिव्यांची एक दीपमाला तयार होते फुलला फुल जोडून फुल जोडत गेले की फुलांचा एक हार तयार होतो आणि माणसाला माणूस जुळत गेला की माणुसकीच एक सुंदर एक नातं तयार होतो माती एकत्र आली की वीट तयार होते वीट एकत्र आल्यावर भिंत तयार होते भिंती एकत्र आल्यानंतर घर तयार होते समाज हा एकसंघ हवा तसेच समाजाने उत्तर उत्तर प्रगती करावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना . डी. एस . देशमुख हायस्कूल थोरगव्हाण शाळेच्या क्रीडांगणावरती दिनांक 2 /2 /2015 रोजी थोरगव्हाण येथे भव्य असा पहिला वधु वर मेळावा आयोजित करण्यात आला हा मेळावा केवळ वर वधू सूची मिळावी यासाठी नाही तर आपल्या भावी आयुष्यात सुखी संसारासाठी उत्तम चरितार्थ साठी व आपल्याबरोबर आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी उत्तम मार्गदर्शक उत्तम मित्र उत्तम जीवनसाथी प्राप्त करून देणारा हा एक स्तुत्य उपक्रम आहे समाजातील बंधू भगिनी योग्य गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केलेला उल्लेखनीय कार्यांचा ठसा त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा गुणवंत यशवंतांचा परिचय सत्कार आदर्श भावे पिढीला व्हावा आपलेपणाची भावना वाढीस लागावी यासाठी मान्यवरांचा सत्कार व परिचय करण्यात मंडळ सहकार्याची भावना करीत आहे शिक्षित समाज म्हणून दोघांकडे समाजाने नेहमीच वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून सामाजिक समस्यांचा निपटारा केला आहे .
आजच्या काळात उच्च शिक्षण घेऊन समाजबांधव रोजगार नोकरी व्यवसाय निमित्त राज्यात पर राज्यात विदेशात स्थलांतरित झालेले आहे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले श्री भैरवनाथ महाराज यांच्या पावन स्मृतीला त्यांच्या पावन स्मृतीने कोणी झालेले आहे या भूमीत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त सर्व समाज बांधव एकत्र यावे स्नेहभावना वाढावी सामाजिक सलोख्यातून वधू-वरांच्या परिचयातून विवाह जुळण्यासाठी त्यांना हक्काचे सामाजिक व्यासपीठ आम्ही तयार करून दिलेले आहे .